STORIES OF STRENGTH & SURVIVAL
Journey of Strength and Hope
At Brainline, we believe in the power of sharing. Our “Survivor Strength Stories” features heartfelt narratives from the families and loved ones of brain stroke survivors. These stories illuminate the challenges faced, the resilience shown, and the unwavering hope that guided them through their journey. Join us in honoring their courage and find inspiration in their tales of recovery and determination.
मी माझ्या गावी गेले होते. तारीख होती २३ डिसेंबर. हलकिशी डोकेदुखी जाणवत होती.मायग्रेनचा नेहमीचाच त्रास समजून मी एक वेदनाशमक गोळी घेतली. पूर्ण दिवसभर डोके तसे दुखतच
होते. आंघोळीला म्हणून बाथरूममध्ये गेले, तर अचानक इलेक्ट्रिक वायर मधून करंट लागावा तसे मला झाले. मी घाबरूम कशीतरी बाथरूम बाहेर आले. त्याचवेळी मला उलट्या व जुलाब होऊ लागले. वेळ न घालवता मी गावातील क्लिनिक गाठले. माझी अवस्था पाहून तिथल्या डॉक्टरांनी मला दाखल करून घेतले. माझी डोकेदुखी व झालेल्या त्रासावर औषधोपचार करण्यात आले. अर्ध्या एक तासात मला बरे वाटू लागले खरे परंतु माझे अंतर्मन मला सांगू लागले, आजचा हा त्रास काहीतरी गंभीर आजाराची पूर्व सूचना देतोय. मुंबई गाठायला हवी! आणि आम्ही मुंबईत येऊन दाखल झालो.
मला मायग्रेनचा (अर्धशिशी) त्रास बऱ्याच वर्षांपासून होता. गावी औषधोपचाराने तेवढ्यापुरती डोकेदुखी थांबली होती; परंतु आता या दुखण्याने परत डोके वर काढले. मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. तो दिवस रविवार होता. वेदना थांबण्यासाठी औषध देण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळीच MRI साठी मला नेण्यात आले. MRI चा रिपोर्ट मेंदूत रक्तस्त्राव (brain haemorrhage ) दाखवत होता. माझ्या कुटुंबियांनी मला नवी मुंबईतल्या वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलला नेले. तिथे अॅडमिट करण्यात आल्यावर तपासण्यां मध्ये रक्तदाब नॉर्मल नसल्याचे दिसून आले. रक्तदाब वाढला होता. एकीकडे डॉक्टर माझे BP नॉर्मल होण्याची वाट पहात होते, तर दुसरीकडे ऑपरेशनची तयारी सुरू होती. तोपर्यंत मी कोमात गेले होते. आणि…. इथेच मला
डॉ. अशोक हांडे यांच्या रूपात परमेश्वर भेटला. न्युरोसर्जन डॉ. अशोक हांडे! वाटते, रुग्णांच्या वेदना दूर करण्याची एक अलौकिक शक्तीच परमेश्वराने त्यांना प्रदान केली आहे. त्यांनीच माझी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या हातात जादू आहे. मी डॉ. हांडे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांची खूप आभारी आहे. पूर्ण उपचारादरम्यान सर्व टीमने माझी आपुलकीच्या नात्याने काळजी घेतली. त्यांच्याशी संवाद करताना
आपल्याच कुटुंबातील व्यक्तीशी संवाद करीत आहोत असेच वाटे. डॉ. हांडे आपल्या सर्व शंका कुशंकांचे निरसन सविस्तर अगदी शांतपणे करतात. पेशंट आणि त्याचे नातेवाईक आधीच घाबरलेले असतात. अशा संवादातून त्यांच्या मनातली भीती नाहीशी होऊन पेशंटला आणि नातेवाईकांना देखील एक प्रकारचा दिलासा मिळत असतो. म्हणूनच माझ्यासाठी डॉ. अशोक हांडे हे देवाचेच रूप आहे. आपण देव
मंदिरात असतो असे समजून दर्शनासाठी तिथे जातो परंतु तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आसपासच असतो. आपली देवावर अपार श्रद्धा असते तशी माझी डॉ. अशोक हांडेंवर आहे. जर मला कधी परत असा त्रास झालाच तर डॉ. हांडे नक्कीच मला या त्रासातून वाचवतील ही ती श्रद्धा ! गावी असताना मायग्रेनमुळे जो तीव्र त्रास झाला, त्याला मायग्रेन अॅटॅक म्हणू शकतो. तिथे तात्पुरत्या उपचाराने बरे तर वाटले. मुंबईत आल्यावर जेव्हा पुन्हा डोकेदुखी सुरू झाली तेव्हा वाटले, या दुखण्यातून आपण कधीच बरे होणार नाही. हे दुखणं आपला जीव घेणार! संपलं सारं ! पण …शस्त्रक्रिये नंतर मी वेदना मुक्त झाले आणि तब्येत पूर्ववत व्हायला ही वेळ लागला नाही. आधी सततची डोकेदुखी असताना आणि आता शस्त्रक्रिये नंतर मला माझ्यात खूप बदल जाणवतो. प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वास वाटतो. मी पूर्ववत झाल्याचे समाधान वाटते. याचे सर्व श्रेय मी डॉ. हांडे यांना देते; कारण त्यांनी मला नवे जीवन दिले आहे. मी कोमात गेले होते. आयुष्य संपल्यातच जमा होते. डॉक्टरांमुळे आज माझा पुनर्जन्म झाला आहे. त्यांचे नुसते आभार मानणे एक औपचारिकता ठरेल. ते माझ्यासाठी आता परमेश्वराचेच एक रूप आहेत ! त्यांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करते.
“This is a heartfelt sharing of how our life as a family changed in a matter of moments.. changed that we only have far back memories of life before..
A super successful career in investment banking, razor sharp intellect and a heart and head that only wished good for all. That’s my dear husband. Aside this was a firm belief that I am superman , can take loads of work stress and zero work life balance which was “dealt” with multiple packs of cigarettes and pegs of alcohol and a diet that by only looking at , could cause body disaster.. And the every night promise of “ from tomorrow I’ll be regular in my walks”. In short .. the man was so entrenched in his work and fulfilling career . Or so he thought. Complete disregard of the body that housed his breath and life.
The brain stroke struck. And how. Massive , causing complete paralysis of the functional side, coma that led to a crucial needed surgery, extended hospital stay that caused huge bills to pay.. leaving me to fend for myself and my child who was just in high school. On the brink of giving her class 10 boards. How are we going to live now?? This was the only anxiety consuming me. I am responsible for my child. I need to keep my heart promise of giving her a good life . The rehab was painful for him and us, the confusion and uncertainty of life staring mercilessly which even prompted us to think of ending our lives. The bitter truth that the person post the stroke is not the same .. the stark behavioural changes, the feeling of helplessness which manifested as tantrums , the social agony and shame my daughter and I underwent when people would stare , pass comments, the free suggestions that were offered which burdened an already battered spirit .. the man could not talk and walk like before . He ceased being the solid rock he was to my daughter and me. Protecting us like two delicate flowers from the big bad world while suddenly we were thrown deep into the same harsh reality . For no apparent fault of ours.. could term it otherwise as Karma. The only truth I’ve learnt by this whole catastrophe..
Look after your body and your body will look after you..”
-A relative of a Survivor
In november, on next day of laxmi poojan 13th nov, During MRI My Mother Mrs. Madhavi Vibhandik had a brain stroke and was diagonose with interparchyemal brain hammeorage. Her midline was shift with right side asphaligic and doctors recommended for decompression craniotomy. She was taken to Fortis hospital for further treatment, It was successfully carried by our Human God Dr. Ashok Hande Sir and his team dr tushar, dr warade & all and my mother life was saved. Post 1 month she had a cranioplasty. Now her recovery is good. Doctor Ashok Hande Sir had great practise and rock steady hands and is fully aware of situations and line of actions.
My mother had nothing , not a single tablet she been taking before brain stroke but only Overthinking, Taking Stress of Small Small things, lifestyle changes when shifted to mumbai from hometown and she has Deep Veins Thrombosis due to which her neuro physician doctor suggested to do MRI and also she was admitted to hospital for malaria….During MRI Diagnosis she was afraid and taken shock and her blood vessels got ruptured and there was a brain hammeorage. For no reason she had to suffer for this unpredictable brain issue. But now she is recovering well. Hence would request everyone not to take any tensions, avoid stress, do physical activities, enjoy life and for gods sake nothing should happen to anybody but if unfortunately anything happened, stay calm, keep patience and take right decision within that golden hour because for brain stroke time is very important and most importantly trust Doctors, and Dr. Hande is there for you
Thanks once again sir
-Story of a Relative